

Jalna News
esakal
धाकलगाव: जालना ते वडिगोद्री या महामार्गाचे गेल्या पाच वर्षांत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, या मार्गावरील बसथांबे नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यात आलेले नाहीत. काही मोजक्या ठिकाणी थांबे असले तरी ते योग्य ठिकाणी नसल्याने नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग होत नाही.