Water Crisis: डिसेंबरनंतर पाणीटंचाईचे संकट होणार गडद ;जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ७.६४ टक्के साठा, ६८ टँकर सुरू

Jalna Water Crisis: जालना जिल्ह्यातील ६७ मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ ७.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ३१ प्रकल्प कोरडे पडले असून ६८ टँकरद्वारे ४९ गावांसह १६ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबरनंतर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
A 50-foot-deep well has dried up in Utwad as water scarcity intensifies across Jalna district

A 50-foot-deep well has dried up in Utwad as water scarcity intensifies across Jalna district

esakal

Updated on: 

जालना, : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील सात मध्यम आणि ६० लघू प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ७.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी सध्या ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता डिसेंबरनंतर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...