.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जालना : मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम-लघू प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची आवक सुरू झाली असून, आतापर्यंत ४.८६ पाणीसाठा झाला आहे. तर, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात सुमारे दहा फूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील काळात पावसाचा जोर असा राहिला तर पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.