

Jalna Women Travel to Mumbai Daily to Sell Medicinal and Religious Leaves Amid Drought
esakal
घनसावंगी : दुष्काळी झळा जेव्हा तीव्र होतात, तेव्हा रोजगाराचा प्रश्न तीव्र होतो. अशा स्थितीत हातपाय गाळून बसण्यापेक्षा रोजगाराची नवी संधी शोधणे आव्हानात्मक असते. पण जालना जिल्ह्यातील महिलांनी हे दिव्य मोठ्या उमेदीने पार केले. पिके, भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध नसला, तरीही या महिलांनी लिंब पाला, आंब्याची पाने, आपटा, अशोकाची पाने व इतर आयुर्वेदिक, धार्मिक कामांसाठी लागणारा पाला मुंबईत नेऊन विक्री करण्यास सुरवात केली. रेल्वेने दररोज मुंबईला जाऊन हा पाला विक्री करून या महिला कुटुंबाचा आधार ठरताहेत.