हिंगोलीतील 'या' दोन ग्रामपंचायतींनी मिळवले आयएसओ मानांकन

hingoli
hingoli

हिंगोली : जिल्ह्यातील जामठी बुद्रुक व जयपुर या दोन ग्रामपंचायतींना उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी आयएसओ-९००१ मानांकन दर्जा मिळाला आहे. सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जामठी बुद्रुक व जयपूर या दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन दर्जा प्राप्त झाला आहे. सेनगाव पंचायत समितीला तसे प्रशस्तीपत्र आज प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प होता.

दरम्यान, या दोन्ही ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी नियोजनाने केली आहे. १४ व्या वित्त आयोगातून घरकुल, रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गावकऱ्यांना देखील सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

सर्व प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. रस्त्यावर पेव्हर ब्लॉक, विद्युतीकरण केले आहे. जयपुर ग्रामपंचायतीने स्वतंत्र मंगलकार्यालय बांधले आहे. गाव टँकर मुक्त केले आहे. यासाठी गाव तलाव करून पाणी उपलब्ध झाले आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अ,ब,क,ड श्रेणीत लाऊन जतन केले आहे. तसेच परिसर स्वच्छता करून वृक्षारोपण केले आहे. 

जयपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सीताबाई पायघन, शिवाजी पायघन, ग्रामसेवक संदीप काळे यासह सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. तर जामठीचे सरपंच मधूकर जाधव यांच्यासह सर्वानी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, औरंगाबाद पारिजात संस्थेकडून आयएसओ नामाकंन मिळविले आहे.

गावकऱ्यांचे मिळाले सहकार्य... 

जयपूर ग्रामपंचायतीने शासनाच्या अनेक योजना गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात राबविल्या आहेत. गावात पाण्याची देखील सोय केली आहे. या सर्व कामाची दखल घेत आयएसओ मानाकंन मिळाले आहे, असे जयपूरचे ग्रामसेवक संदीप काळे म्हणाले. 

संपादन : सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com