जवानाचे कुटुंबीय दहशतीखाली...कुठे ते वाचा

फोटो
फोटो

नांदेड : देशाचे रक्षण करण्यासाठी जम्मू- काश्मीरसारखे अत्यंत कठीण प्रदेशावर देशसेवा बजावणाऱ्या जवानाच्या कुटुंबातील सदस्य मात्र गावातील गावगुंडाच्या दहशतीखाली असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाही तर या गुंडांवर कारवाई करण्याऐवजी कंधार पोलीस अवैध दारू विकणाऱ्या गावगुंडांची पाठराखण करत असल्याने, ‘ मी देश सेवा करू का घरच्यांची सेवा करू’ असा सवाल उपस्थित करत भारतीय जवानाने चक्क पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले.

कंधार तालुक्याती शेलाळ येथील भारतीय जवान दिलीप नागोराव केंद्रे हे भारतीय लष्करात युनिट 14 मराठा एल आय मार्फत 56 ये पी ओ मधून देश सेवा बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते भारतीय सीमेवर  खडा पहारा देत आहेत. देश सेवा करणाऱ्या दिलीप केंद्रे यांच्या मूळ गावातील काही गावगुंडाने दिलीप यांचे बंधू व आई- वडिलांना नाहक त्रास सुरू केला आहे. गावगुंडांकडून गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात होती. या अवैध दारूविक्री विरुद्ध दिलीप केंद्रे यांच्या भावाने पोलिसात तक्रार केली होती. पोलिसात त्यांच्याविरुद्ध तक्रार का दिली असे कारण पुढे करत गावातील बालाजी दगडोबा गीते, वैभव बालाजी गीते, दत्ता दगडोबा गीते, नागेश श्रीमंत गीते यांनी जवान दिलीप केंद्रे यांचे बंधू संदीप केंद्रे यांना जोरदार मारहाण केली.

हेही वाचा - ‘हा’ विभाग ठरला विश्‍वासास पात्र : कोणता ते वाचाच
 
कंधार पोलिसांकडून अर्जदारांची हेटाळणी
 
याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्या ता. 13 फेब्रुवारी रोजी कारवाईसाठी रीतसर अर्ज देण्यात आला परंतु कंधार पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. घटना घडून सात दिवसाचा कालावधी लोटला तरी कंधार पोलिसांकडून देशाची सेवा बजावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना साधे संरक्षण पुरविता आलेनही. ही बाब अत्यंत गंभीर अशी आहे. न्याय मागणीसाठी आणि गावातील गुंडांचा बंदोबस्त करावा यासाठी कंधार पोलीस ठाण्याचे उंबरे झिजविल्यानंतर आता भारतीय जवान दिलीप केंद्रे यांनी पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. 

कुटुंबाला संरक्षण मिळावे

आपल्याला व आपल्या कुटुंबाला संरक्षण दिल्याशिवाय आपण इथून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्ती केली. त्यामुळे पोलिस अधीक्षक भारतीय जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना संरक्षण पुरवून, गावगुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. एवढेच नाही तर न्याय मागणीसाठी भारतीय जवान केंद्रे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आहे. आता प्रकरणात पोलीस अधीक्षक काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com