Student Health
Jawahar Navodaya VidyalayaSakal

Student Health : जवाहर नवोदय विद्यालयातील पिण्याच्या पाण्यात चक्क पक्ष्यांची विष्ठा; कावीळचे कारण आले समोर

Health : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांची विष्ठा सापडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यालयात ३०० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले असून खानावळीत सडलेल्या भाज्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

लातूर : शहरातील जवाहर नवोदय विद्यालयात झाकण नसलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ झाड आहे. या झाडावर बसलेल्या पक्ष्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्यात पडत होती आणि त्यात पाण्याने विद्यार्थी तहान भागवीत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत किती हलगर्जीपणा होत आहे, हे स्पष्ट होत आहे. मुले आजारी पडल्यानंतर टाकीवर झाकण बसविण्याऐवजी चक्क झाडच तोडून ‘जवाहर नवोदय’ने आणखी एक कळसच गाठला.

जवाहर नवोदय विद्यालयात ४४१ मुले शिक्षण घेत आहेत. हे जुने विद्यालय असून याचा लौकिक आहे. पण येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे, येथील व्यवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत विद्यालयातील ३७ हून अधिक विद्यार्थ्यांना कावीळ झाली आहे. तर ३०० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले आहेत.

त्यामुळे तहसीलदार सौदागर तांदळे आणि त्यांच्या पथकाने अचानक जवाहर नवोदय विद्यालयाची पाहणी केली. त्यांच्या पाहणीत धक्कादायक माहिती समोर आली असून त्यांनी ती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यासमोर मंगळवारी (ता. आठ) सादर केली.

खानावळीत सडलेल्या भाज्या

तहसीलदार तांदळे म्हणाले, की येथील विद्यार्थी सतत आजारी पडत असल्याने आम्ही विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. तेव्हा येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला झाकण नव्हते. शेजारच्या झाडावरून पक्ष्यांची विष्ठा पाण्यात पडत होती. तेच पाणी दुसऱ्या टाकीत घेतले जात होते. त्या टाकीतही प्रचंड शेवाळे साचले होते.

हे पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. ठिकठिकाणी पाण्याची गळतीही होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही येथील खानावळीला भेट दिली. खानावळीत अत्यंत सडलेल्या भाज्या आम्हांला पाहायला मिळाल्या.

त्याच भाज्या चिरून मुलांना दिल्या जात होत्या. स्वत:च्या फायद्यासाठी खानावळ चालक हे करीत होता. जेवणासाठी वापरले जाणारे धान्यही चांगल्या प्रतीचे नव्हते. विद्यालयाच्या परिसराची स्वच्छता पाहिजे तशी नव्हती, असे निरीक्षणही तांदळे यांनी नोंदविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com