
पैठण : जायकवाडी पक्षी अभयारण्य येथे रविवारी (ता. १९) आशियायी पाणपक्षी गणना आज करण्यात आली. ३५ हजार हेक्टर वर असलेल्या या अभयारण्यात सुमारे २८ ठिकाणी एकाच वेळी सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत ही गणना झाली. त्यात पक्षांच्या शेकडो प्रजाती आढळुन आल्या. फ्लेमिंगो हा पक्षी शेकडो च्या थव्याने टाकळी, रामडोव्ह, मावसगव्हान परिसरात आढळला जायकवाडी पक्षी अभयारण्यातील जैविक विविधता, स्थलांतरित पक्षांची संख्या गणना करण्यासाठी विभागीय वन अधिकारी राहुल सपकाळ यांनी दहा पथके तयार केली होती.