

Marathwada News
esakal
जायकवाडी: मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी (नाथसागर) जलाशयाला एप्रिलच्या मध्यावरच उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवल्याने जलाशयातील बाष्पीभवनाचा वेग वाढणार असून, पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.