जायकवाडी: जायकवाडी येथील नाथसागर धरणाचा वीजपुरवठा अवघ्या ६ लाख रुपयांच्या थकीत बिलापोटी खंडित झाल्याचे वृत्त ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले..या वृत्ताची गंभीर दखल घेत महावितरण कंपनीने गुरुवारी (ता. २६) तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला असून, धरण परिसरातील यंत्रणा सुरळीत झाली आहे..Marathwada News: मराठवाड्यात अवकाळी पावसाचा फटका; ११ हजार हेक्टरवर रब्बी व फळबागांचे नुकसान.बुधवारी (ता. २५) सायंकाळी अचानक वीज खंडित केल्याने या अतिसंवेदनशील प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. रात्रभर धरण परिसरात अंधार असल्याने सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला होता..Premium|Kailasa Temple Ellora : कैलास मंदिर; वेरूळच्या पाषाणी महाकाव्याची अद्भुत गाथा .या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभागाने महावितरणला ‘इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३’ मधील तरतुदींचा दाखला दिला. राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाची वीज तोडणे गंभीर परिणाम घडवू शकते, असे सांगण्यात आले. अखेर महावितरणने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता वीजपुरवठा सुरू केला. थकीत वीजबिलाचा धनादेश लवकरच सादर केला जाईल, अशी माहिती उपविभागीय अभियंता श्रद्धा निंबाळकर यांनी दिली..नियम काय सांगतो?वीज कायदा ग्राहकाचे देयक थकल्यास वीज तोडण्याचा अधिकार देतो. मात्र, जायकवाडीसारख्या अतिसंवेदनशील आणि सार्वजनिक सुरक्षिततेशी निगडित प्रकल्पांच्या बाबतीत हा अधिकार वापरताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी वीज खंडित केल्यास मोठे धोके निर्माण होऊ शकतात, त्यामुळे येथे समन्वय आणि विवेकाची अधिक गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.