

Jayakwadi Dam Water Storage Rises Near 80 Percent Improving Irrigation Drinking Water and Farm Prospects in Marathwada
sakal
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर): मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैठण येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (ता. एक) सायंकाळी ६ पर्यंत धरण ७९.७४ टक्के भरले आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा १७३१.०५८ दशलक्ष घनमीटर (६१.१२ टीएमसी) इतका झाला. आता धरण ८० टक्के क्षमतेच्या अगदी उंबरठ्यावर पोचले आहे.