अवैध धंद्याचा कर्दनकाळ जयंत मीना- परभणीचे नवे पोलिस अधिक्षक

file photo
file photo

परभणी ः बारामती (जि. पुणे) येथील अवैध धंद्यावर आपल्या कार्यकुशलतेने अंकुश बसवून अवैध धंद्याचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे जयंत मीना यांची गुरुवारी (ता.१७) रात्री परभणीचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली केली आहे. जयंत मीना हे बारामती येथे अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षकपदी जयंत मीना यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. गुरुवारी रात्री या संबंधी आदेश  काढले आहेत. मावळते अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची बदली झाली असली तरी त्यांच्या पदस्थापनेचे आदेश अद्यापही आलेले नाहीत.

एक धडाकेबाज तरूण अधिकारी म्हणून त्यांची ओळख

जयंत मीना हे या आगोदर बारामती (जि.पुणे) येथे अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बारामती शहरातील अवैध्य व्यवसायाविरोधात कंबर कसली होती. एक धडाकेबाज तरूण अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कोणत्याही प्रकरणात विचार विनिमय व बैठकापैक्षा थेट कारवाई करण्यावरच त्यांचा भर असतो. त्यामुळे बारामती शहरात अल्पावधीतच त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कामाची पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दखल घेतलेली आहे.

कृष्णकांत उपाध्याय यांची बदली

पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या दोन वर्षाच्या काळात या जिल्ह्यातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण केला होता. अट्टल गून्हेगारांविरूध्द मोहिमच राबवली. त्यापैकी बहूतांशी गुन्हेगारांना हद्दपार केले. जिल्ह्यात कायम कायदा व सूव्यवस्था  रहावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.त्यामूळेच कोणाही  समाजकंटकांनी, उपद्रवी  व्यक्तींनी दहशतीपोटी डोकेवर काढण्याचे धाडस केले नाही. मटका, जूगार, अवैध दारू विक्री अन्य अवैध व्यवसायाविरूध्दच्या मोहिमांही गाजल्या. उपाध्याय यांची प्रसाशनावर मोठी पकड होती.

काही कर्मचाऱ्याना निलंबित तर दोन कर्मचारी सेवेतुन बदतर्फसुद्धा केले

अगदी छोट्या मोठ्या हालचालीवर लक्ष असतं.पोलिस खात्यात शिस्त असावी यासाठी ते सदैव प्रयत्न करीत. विशेष म्हणजे चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक,कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचारांविरध्दही  कठोर भूमिका घेतल्या.कामात घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षात बदल्या करित कर्तव्यात कुचराई जमणार नसल्याचे स्पष्ट केले. वेळप्रसंगी काही कर्मचाऱ्याना निलंबित तर दोन कर्मचारी सेवेतुन बदतर्फसुद्धा केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com