परळी वैजनाथ : कृषीमंत्री धनंजय मुंडेंना २०२४ नंतर मोठी जबाबदारी देवू असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत तटकरे यांनी केले. तर आँक्टोबर व नोहेबरचे लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्ही १० आँक्टोबर पर्यंत देणार आहोत. है पैसे स्वतः साठी वापरा, महिलांनी सन्मानांनी राहावे यासाठीच ही योजना आणली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
परळी विधानसभा निवडणूक मीच जिंकणार असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जन सन्मान यात्रेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (ता.०१) जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याच ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, धनंजय मुंडे तुम्ही परळी पुरते नेते नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहात, गोपीनाथ मुंडे नंतर विरोधी पक्षनेता कसा असावा हे धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला दाखवले.लाडकी बहिण नावाची योजना महाराष्ट्राला अजित पवारांनी दिली. तर २४ नंतर याहीपेक्षा मोठी जबाबदारी धनंजय मुंडे यांना देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, बीड जिल्ह्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर प्रेम करते. माझे बीड जिल्ह्यावर प्रेम, परळीकरांवर विशेष प्रेम आहे. तालुक्यातील वडखेल येथे लवकरच सिताफळ इस्टेट उभी करणार आहोत,
जिरेवाडी येथे शासकीय कृषी महाविद्यालय,कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. शासनाच्या योजना तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून
महिलांना सक्षम, आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आहे.१० व्या अर्थसंकल्पात महिलांना समोर ठेवून योजना ठरवण्यात आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर ४६ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. केंद्रातील सरकार आपल्या विचारांचे असल्याने आम्ही म्हटल्या बरोबर कांदा निर्यातीवरील बंदी उठवली,आँक्टोबर व नोहेबरचे लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्ही १० आँक्टोबर पर्यंत देणार आहोत.
है पैसे स्वतः साठी वापरा, महिलांनी सन्मानांनी राहावे.पैसे कमी पडू देणार नाही. नालायक लोक असतात काही चुकीच्या घटना घडतात..बदलापूर येथील आरोपींना फाशीची शिक्षा द्या असे सर्वजण व विरोधक मागणी करत होते.
आमच्या योजनेमुळे विरोधकांच्या पोटात मळमळ होत आहे. तुम्ही कशी ही योजना बंद करता ते बघू आम्हीच निवडून येणार, येणाऱ्या निवडणुकीत महायुती सरकारला निवडून आणा, सरकार आल्यास या सर्व योजना पुढील पाच वर्षे सुरू राहतील.
प्रास्ताविक करताना मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मला कितीही टारगेट करण्याचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या निवडणुकीत जनतेने टारगेट ठरवले असल्याने ते टारगेट उडवल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत महायुती कडून पंकजा मुंडे निवडणुकीत उभ्या होत्या या मतदारसंघात ७५ हजारांची लिड दिली.
ज्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे, त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवेल. तालुक्यातील ९४ हजार भगिनींना लाडकी बहिणींना फायदा मिळाला आहे, हा मतदारसंघ आम्ही जिंकणारच पण त्याबरोबरच जिल्ह्यातील सहाही जागा जिंकणार असे धनंजय मुंडे म्हणाले. या जन सन्मान यात्रेस आमदार विक्रम काळे, कल्याण आखाडे, राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी,अजय मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथ सोळंकेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील अक्षरा अक्षय शिंदे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षरा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे,धनंजय मुंडे यांना त्यांनी बनवलेले आर्टिफिशल वटवृक्ष भेट देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज चौकातून निघालेल्या रँलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे सहभागी झाले होते. यावेळी अजित पवारांचे ठिकठिकाणी जिसीबीच्या साह्याने पु्ष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या रस्त्यावर सर्व गुलाबी स्वागत कमानी उभ्या करण्यात आलेल्या असल्याने संपूर्ण रस्ता गुलाबी झाला होता. रस्त्यावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या रँलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.