

Tribute paid at the Jevli earthquake memorial on the 33rd anniversary of the 1993 Latur-Dharashiv earthquake
esakal
३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या भीषण घटनेला ३३ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (ता. ३०) जेवळी येथील भूकंप स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.