

Maratha reservation supporters stage a ‘Sholay-style’ protest atop a water tank in Jevli, Dharashiv.
Sakal
जेवळी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तात्पुरते स्थगित झाले असले तरी लढा कायम असल्याचा संदेश देत गुरुवारी (ता. १७) लोहारा तालुक्यातील जेवळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र 'शोले स्टाईल' आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी दिलेल्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.