

Jewali Village Burglary Raises Fear As Thieves Target 5 To 6 Locked Houses And Steal Jewellery Cash And A Bike
esakal
जेवळी: जेवळी (ता.लोहारा) येथे सोमवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत एकाच रात्री पाच ते सहा ठिकाणी धाडसी घरफोडी केली. या घटनेत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, कपडे, धान्यासह अंगणात उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी लुटलेला मुद्देमाल लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे. काही घरमालक सध्या बाहेरगावी असल्याने ते गावी परतल्यानंतरच चोरी गेलेल्या एकूण ऐवजाचा अचूक आकडा समोर येईल. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पुन्हा या धाडसी चोरीमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.