दोन लाखांचे दागिने परत करुन माणुसकीचे घडविले दर्शन

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणी येथील बसस्थानकात सापडलेले दोन लाख रुपयांचे दागिने मंगळवारी (ता. ११) सायंकाळी बसस्थानकातील आगार प्रमुख दयानंद पाटील यांनी संबंधितांना परत केले.

रामपुरी (ता. मानवत) येथील मधुकर नाईक हे सांगली बँकेत ठेवलेले दागिने घेऊन मंगळवारी गावाकडे निघाले होते. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या खिशात ठेवलेले दागिने बसस्थानकात पडले. पडलेले दागिन्यांचे ते पाकीट प्रवाशास सापडले व प्रवाशाने तत्काळ नियंत्रक लखन पवार व गंगाधर गरड यांच्या स्वाधीन केले. श्री. गरड व श्री. पवार यांनी ते पाकीट पाहिले असता त्यात दागिने असल्याने त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आगार प्रमुख दयानंद पाटील यांना सांगितले.

 बॅंकेच्या पावतीवरुन घेतला शोध
श्री. पाटील यांनी दागिन्यांचे पाकीट पाहिले त्या वेळी त्यात सांगली अर्बन बँकेची पावती आढळली. त्यावरून त्यांनी सांगली बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला व दागिन्यांचे पाकीट सापडल्याचे सांगितले. त्यात पावती असल्याची माहिती दिली. संबंधित व्यवस्थापकांनी मधुकर नाईक (रामपुरी) यांचा पत्ता व संपर्क क्रमांक दिला.
आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी मधुकर नाईक यांच्याशी संपर्क साधला. या वेळी श्री. नाईक यांनी आपले दागिने हरवले असल्याचे म्हटले. त्यावर श्री. पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी उपस्थितांसमक्ष दोन लाख रुपये किमतीचे दागिने मधुकर नाईक यांना परत केले.


गावाकडे जाताना दागिने हरवले
सांगली अर्बन बँकेत ठेवलेले दागिने ८५ हजार ८३८ रुपये भरून मंगळवारी सोडून घेतले होते. दवाखान्याच्या कामासाठी दागिने बँकेत ठेवले होते. मात्र, गावाकडे परत जाताना मंगळवारी दागिने हरवले. परभणी बरस्थानकात ते सापडले. एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दागिने सापडल्याचे सांगून आपणास तातडीने परत देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
- मधुकर नाईक, रामपुरी.

हेही वाचा .......

लाचप्रकरणी पोहंडूळमध्ये कारवाई
परभणी : संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मंजूर करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोहंडूळ  (ता. मानवत) येथील पोलिस पाटलाच्या पत्नीस रंगेहात पकडण्यात आले आहे. पोहंडूळ येथील पोलिस पाटील लक्ष्मण कोपरटकर याने तक्रारदारास संजय गांधी योजनेचे अनुदान मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे देण्यात आल्याने मंगळवारी (ता. ११) सापळा रचण्यात आला. त्या वेळी संबंधित पोलिस पाटलाच्या पत्नीने तीन हजार रुपयांची लाट स्वीकारली. या प्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com