

Ganja Cultivation Found in Jintur Turmeric Farm Police Seize 16.455 Kg Ganja and Nine Plants Worth 8.22 Lakh
esakal
जिंतूर: तालुक्यातील कान्हा शेतशिवारात एका शेतातील हळदीच्या पिकात बेकायदा गांजाची लागवड केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा परभणी व बामणी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गांजाची नऊ झाडे तसेच एकूण १६ किलो ४५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ८ लाख २२ हजार ७५० रुपये आहे.