

Three-year-old Sheikh Adhiyan was safely rescued after being trapped 15 feet deep inside a borewell during a two-hour rescue operation.
Sakal
आनंद मुरक्या बोरी
कौसडी : कौसडी (ता . जिंतूर) येथील एका शेतातील बंद असलेल्या कुपनलिके मध्ये तीन वर्षीय चिमुकला बालक पडल्याची घटना बुधवारी (ता.१९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान,गावकरी व प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून दोन तासानंतर चिमुकल्या सुखरूप कुपनलिके मधून बाहेर काढले.