

Parbhani
esakal
जिंतूर: तालुक्यातील वर्णा येथे मागील चार वर्षांपासून सुरू असलेले जल जीवन मिशन अंतर्गतच्या पाणी योजनेचे काम अद्यापही पूर्णत्वास आले नसल्याने ग्रामवासीयांना तीव्र पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे.
खासगी विहिरीतील पाण्यासाठी प्रत्येक घराला महिन्याकाठी पाचशे रुपये मोजावे लागत आहेत. तालुक्यातील वर्णा गावची लोकसंख्या साडेतीन हजार असून जल जीवन योजनेअंतर्गत नळजोडण्या २८४ आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत ३०० नळ कनेक्शन आहेत.