
- रविंद्र गायकवाड
बिडकीन - गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे, या समस्येने 'टॉवर आहे नावाला, मात्र रेंज नाही गावाला', अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आल्याची बिडकीन शहरातील घटना समोर आली आहे.
गावात जियो मोबाईल कंपनीचा टॉवर असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मोबाईलधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेंज मिळविण्यासाठी ग्राहक रेंजचा शोध घेत आहेत. येथे काही वर्षांपूर्वी जियो कंपनीने टॉवर कार्यान्वित केला आहे.येथे खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जियो कंपनीने टॉवर उभारला आहे.