Beed News: वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल-पोलिस ‘साथ-साथ’; आठ भरारी पथके स्थापन, ३४ वाळूघाटांवर ठेवणार लक्ष
Sand Theft Control: वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस व महसूल विभागाने संयुक्त आठ पथके तयार केली आहेत. या पथकांना वाळूघाटांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बीड : जिल्ह्यात काही वर्षांपासून वाळूमाफियांच्या मुजोरीला महसूल व स्थानिक पोलिसांचे पाठबळ कारणीभूत ठरत आहे. मात्र, पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या नियुक्तीनंतर पोलिस दलाने वाळूचोरांवर कारवाया करण्याचा धडाका लावला आहे.