Latur News: यंदा ज्वारीचा कडबा महागला; जळकोट : उत्पादनात घट, पशुपालक शेतकरी अडचणीत

Jowar Fodder Shortage in Jalakot: जळकोट भागातील ज्वारी कडबा महागला; उत्पादनात घट आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत. शासनाने चारा नियोजन तातडीने करावे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

जळकोट: संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. मात्र, यंदा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी, कडब्याची आतापासूनच टंचाई जाणवत आहे. त्यातच ज्वारीचा कडबा महागला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, पशुधनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ज्वारीच्या कडब्याची टंचाई निर्माण झाली आहे. कडब्याचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक गणित कोलमडले आहे. मुक्या जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com