Dharashiv News: ज्वारीसोबत कडब्यानेही दिला हातभार; दर दीडपटीने वाढल्याने शेतकरी आनंदात

Increased Demand from Livestock Farmers: धाराशिवमध्ये ज्वारीसोबत कडब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कडब्याचे भाव दीडपटीने वाढून ८०० ते ११५० रुपये झाले असून पशुपालकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: रब्बी हंगामातील ज्वारीचा दाणा घरात येत असतानाच, यंदा कडब्यानेही शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक आधार दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कडब्याचे दर यंदा दीडपटीने वाढले असून, कडबा बाजारात प्रतिक्विंटल ८०० ते ११५० रुपयांपर्यंत भाव पोहोचले आहेत. पावसाळी टंचाईच्या धास्तीने पशुपालक आताच शेतातून जागेवरच शेकडा पेंडीप्रमाणे कडबा खरेदी करीत असून, रानोमाळ कडब्याच्या गंजी लावण्याची लगबग पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com