Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

Sharp Rise in Jowar Prices Hits Consumers: ज्वारीच्या दरात दुपटीने वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या भाकरीवर महागाईची झळ बसली आहे. रब्बी ज्वारी उत्पादन घटल्याने बाजारात दर ५ ते ६ हजारांवर पोहोचले आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

देवणी: उत्पादनातील घटीमुळे ज्वारी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून, सहा हजारांवर ज्वारीचे दर पोहचल्याने ‘भाकरीचा चंद्र’ महागला आहे.

पेरणीपासूनच पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, घटलेले ज्वारीचे दर, अधिकच्या थंडीमुळे पिकवाढीवर झालेला परिणाम, पाखर राखणीसाठी मनुष्यबळाची अडचण, पेरणीपासून काढणीपर्यंत वाढलेल्या अडचणींमुळे ज्वारी अडचणीत आली आहे. ज्वारीच्या उत्पादनातील घटीमुळे ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात ५५ ते ६० रुपये किलो ज्वारीचे दर पोचले असल्याने सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर ज्वारी गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com