Latur Jowar Price News: भाकरीची चवही महाग; ज्वारी सहा हजाराला क्विंटल, किलोमागे ६० ते ७० रुपये.

Rising Jowar Prices in Maharashtra: जळकोटसह राज्यात ज्वारीच्या आवकेत घट झाल्याने दर ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात ज्वारी ६० ते ७० रुपये किलोने विकली जात असून भाकरीची चवही महागली आहे.
Latur Jowar Price News

Latur Jowar Price News

esakal

Updated on

जळकोट: बाजारात ज्वारीची आवक कमी असून भाव वाढू लागले आहेत. सध्या ज्वारीला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. तर किरकोळ बाजारात ज्वारी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहे. पुढील काही महिने बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मात्र, कष्टकऱ्यांच्या आहारातील भाकरी मात्र आता महाग झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com