
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी सोमवारी (ता. नऊ) सुनावणी झाली. याचिकाकर्ती तथा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, तर शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी बाजू मांडली. सुनावणीअंती न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी प्राथमिक मुद्द्यांवर अंतरिम आदेशासाठी प्रकरण राखून ठेवले आहे.