Kailas Gorantyal: कैलास गोरंट्याल यांचा गुरुवारी भाजप प्रवेश; मुंबईमध्ये होणार सोहळा
Jalna Politics: जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल ३१ जुलै रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशानंतर जिल्हा राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जालना: काँग्रेसचे येथील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात गुरुवारी (ता.३१) पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी मंगळवारी (ता. २९) स्वतः जाहीर केले आहे.