कळमनुरी : बियाणे, खतांची चढ्या दराने विक्री

शेतकऱ्यांना आर्थिक झळ; संबंधित अधिकाऱ्‍यांचे दुर्लक्ष
खत
खतsakal

कळमनुरी : पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बी- बियाणे, खतांची जमवाजमव सुरू केली आहे. मात्र, बियाणे व खतांची निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने विक्री होत आहे, हे प्रकार थांबविण्याकरिता तालुका कृषी कार्यालयाकडून नेमलेले भरारी पथक केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे संबंधितांनी जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली असल्याचा आरोप शेतकरी वर्गामधून केला जात आहे.

शेतीची मशागत पूर्ण झाल्यामुळे सध्या शेतकरी पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करत आहेत. असे असतानाच शहर व परिसरात मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते यांची खरेदी करणे सुरू केले आहे. पण, बाजारपेठेत बी- बियाणे व खतांची शासनाकडून निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत.

फुले संगम सोयाबीनची तीन हजार ९०० रुपयांची २७ किलो बियाण्यांची बॅग चार हजार २०० ते ३०० रुपयांना विकली जात आहे. विक्रांत कंपनीची चार हजार रुपयांची बॅग चार हजार ५०० रुपये, विक्रम गोल्डची तीन हजार ९०० किंमत असलेली सोयाबीनची बॅग चार हजार ४०० पर्यंत विकली जात आहे. तीन हजार ९०० रुपये किमतीच्या ६१२ सोयाबीन वाणाची बॅग चार हजार ५०० रुपयांना तर अंकुरची ३० किलो सोयाबीन बियाण्यांच्या बॅगची मूळ किंमत ३,९०० ऐवजी ४,२०० तर ईगल कंपनीचे सोयाबीन बियाणे ३ हजार आठशे रुपयांऐवजी चार हजार १०० रुपयांना विकले जात असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. तसेच खताच्या बाबतीतही हाच प्रकार विक्रेत्यांकडून अवलंबिला जात आहे.

डीएपी खताची टंचाई असल्याचे सांगत तेराशे ५० रुपयांचे डीएपी खत १,४५० रुपयांना विक्री केले जात आहे. या सोबत दहा किलो वजनाची सल्फरची ६५० रुपयांची बॅग शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे. पोटॅश वॉटर सोलूबल १,७०० रुपयांऐवजी १,९०० रुपयांना, २४.२४.०- १,९०० ऐवजी २,१०० रुपयांना, २०.२०.०.१३ हे खत १,१५० ऐवजी १,४५० तर १९.१९.१९ हे १,४५० ऐवजी १,७०० रुपयांना विकल्या जात आहे. सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदारची ३५० ऐवजी ४५० रुपयांना विक्की केली जात आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक झळ; संबंधित अधिकाऱ्‍यांचे दुर्लक्ष

बियाणे व खतांच्या वाढीव किमतीमुळे शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन निश्चित केलेल्या दरामध्ये खते, बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

-शिवाजी जाधव, शेतकरी, कळमनुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com