

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping
esakal
कळंब : शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नगरपरिषद विविध उपक्रम राबवत असतानाही काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असल्याने नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कचरा टाकणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा कडक इशारा त्यांनी दिला आहे.