

Parbhani
esakal
कळमनुरी: तालुक्यात मागील पंधरवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी पूर्ण केली. त्यानंतर सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र, आता आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने उगवलेल्या कोवळ्या पिकांना ओलाव्याची नितांत गरज असून शेतकऱ्यांनी ही पिके वाचवण्याची धडपड सुरू केली आहे.