Soybean Crop
esakal
लिमला,: दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे कमलापुरातील अल्पभूधारक शेतकरी व्यंकटराव मोरे, चंद्रकला मोरे यांनी उभे सोयाबीन पीक काढून पेटवून दिले. पीक उभे असले तरी ते काढण्यासाठी होणारा खर्चही पदरात पडणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे जड अंतःकरणाने मोरे कुटुंबीयांनी व्यथित हा निर्णय घेतला.