Aurala Assault: कांदा चोरीच्या संशयातून टेम्पोचालकाला लोखंडी शॉकअपने मारहाण; औराळा येथील चौघांविरुद्ध देवगाव रंगारी पोलिसांत गुन्हा

कांदा चोरीच्या संशयावरून टेम्पोचालकाला लोखंडी शॉकअपसह लाथाबुक्क्यांनी मारहाण; उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर, देवगाव रंगारी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Tempo driver assaulted over suspected onion theft.

Tempo driver assaulted over suspected onion theft.

Sakal

Updated on

कन्नड : प्रवासी सोडून घरी परतणाऱ्या टेम्पोचालकाला कांदा चोरीचा संशय घेत शिवीगाळ करून लोखंडी शॉकअप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील औराळा शिवारात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत उद्धव वाल्मिक तुपे (३५, रा. बाभुळगाव बु., ता. वैजापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री ते छोट्या हत्ती टेम्पो (एमएच-२० ईएल-२३९८) मधून प्रवासी सोडून घरी परतत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास औराळा गावाजवळ लघुशंकेसाठी ते थांबले असता तीन व्यक्ती तेथे आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com