Kandhar Farm Labour Shortage, Rising Wages, Farmers Crisis: कंधार तालुक्यात सालगड्यांचा तुटवडा; वाढलेल्या मजुरीमुळे शेतकरी अडचणीत

Labour Shortage Hits Farming in Kandhar Taluka: कंधार तालुक्यात सततचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे
Kandhar Farm Labour Shortage, Rising Wages, Farmers Crisis

Kandhar Farm Labour Shortage, Rising Wages, Farmers Crisis

esakal

Updated on

कंधार: तालुक्यात सततचा पाऊस, ढगफुटी व बदलत्या हवामानामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला असून, मजुरांचाही तुटवडा निर्माण झाल्याने सालगड्यांचा (शेती कामगारांचा) भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

परिणामी, शेतकऱ्यांना शेती करणे अधिकच कठीण झाले असून, अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून, बहुतेक शेतकरी शेतीवरच अवलंबून आहेत. मात्र, शेती नफ्यात राहत नसल्याने आणि इतर क्षेत्रांकडे कामगार वळल्यामुळे शेतीसाठी कायमस्वरूपी सालगडी मिळणे अवघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com