

परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील लघू सिंचन प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडा या मागणीसाठी गुरुवारी दुपारी परळी अंबाजोगाई मार्गावरील कन्हेरवाडी परिसरात करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले ग्रामस्थ, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते.
Sakal
परळी वैजनाथ :परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील लघू सिंचन प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी परळी -अंबाजोगाई मार्गावर कन्हेरवाडी परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली.