death in accident
sakal
कन्नड - धुळे-सोलापूर महामार्गावरील कन्नड जवळच्या अंधानेर फाट्याजवळ गुरुवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अर्जुन मांगू चव्हाण (वय-३७, रा. आखतवाडा, ता. खुलताबाद, ह. मु. कन्नड) यांचा मृत्यू झाला. तर कांतीलाल लिमचंद राठोड (वय-४०, रा. तेलवाडी) हे गंभीर जखमी झाले.