

Congress Protest In Kannad Seeks Dry Drought Status Crop Compensation Loan Waiver And Relief For Farmers Facing Crop Loss
esakal
कन्नड: तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानभरपाई द्यावी, तसेच संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. २१) शहरातील पिशोर नाका येथे एका तास निदर्शने करण्यात आली. माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.