

Political Rivalry Suspected Behind the Killing of Raju Pawar
Sakal
कन्नड : तालुक्यातील जामडी (घाट) येथे माजी सरपंचाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. १३) रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राजू रामचंद्र पवार (वय ४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजू पवार हे सकाळी शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. मात्र, ते घरी न परतल्याने घरातील मंडळींनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला; परंतु त्यांनी फोन उचलला नाही.