

Police Register Accidental Death Case; Investigation Underway in Devgaon Rangari
Sakal
कन्नड : तालुक्यातील सासेगाव येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून औराळा-मनुर रोडलगत असलेल्या विटा शिवारात चिकूच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. संजय पुंडलिक घुगे (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही दुर्दैवी घटना रविवारी (ता. २६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी किं, संजय घुगे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. मागील खरीप हंगामात पेरणी आणि लागवडीसाठी त्यांनी बियाणे व खतांच्या खरेदीसाठी काही लोकांकडून हातउसणे, तर काहींकडून व्याजाने पैसे घेतले होते.