

Candidates Whose Deposits Were Forfeited
sakal
संतोष निकम
कन्नड : कन्नड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी ९२ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले होते. यापैकी नगराध्यक्ष पदासाठीच्या एका उमेदवारासह विविध पक्षांच्या एकूण ३१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डिपॉझिट जप्त झालेल्यांमध्ये शिवसेना ६, काँग्रेस ६, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ५, अपक्ष १०, एमआयएम २, तर शरदचंद्र पवार पक्षाच्या १ उमेदवाराचा समावेश आहे.