

Kannad Kharif Crop Crisis Prolonged Rain Break Dries Maize Soybean And Cotton As Farmers Wait For Heavy Rain
esakal
कन्नड: तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली आहेत. पावसातील प्रदीर्घ खंडामुळे शेतांमधील मका, सोयाबीन, कपाशी यांसह इतर पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पिके माना टाकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, उरलेली पिके वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.