

Delay in Government Maize Procurement Raises Farmer Concerns
Sakal
संतोष निकम
कन्नड : कन्नड तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मका पिकाची शासकीय खरेदी सुरू होण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मका खरेदीसाठीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल एक महिना उलटला असतानाही अद्याप शासकीय मका खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे पणन महासंघाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.