

Kannad Teacher Credit Society AGM Witnesses Dispute Over Financial Questions Members Allege Meeting Ended Abruptly
esakal
कन्नड: शहरातील पिशोर रोडवरील कन्नड शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे (आमसभा) रविवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले होते. सभेत सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन, सचिव व संचालक मंडळाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नसल्याचा आरोप काही सभासदांनी केला. त्यामुळे चर्चा सुरू असतानाच आमसभा तडकाफडकी गुंडाळण्यात आल्याचा दावाही सभासदांनी केला.