

Three Minor Boys Go Missing After Leaving for School
Sakal
कन्नड : कन्नड शहरातील तीन अल्पवयीन मुले शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्या तिघांचा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता.२९) रोजी उघडकीस आला. या घटनेमुळे शहरातील पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.