लोहारा (जि. धाराशिव) - शेतबांधाच्या जुन्या वादातून करजखेडा चौरस्त्यावर (ता. धाराशिव) भरदिवसा पती-पत्नीचा कोयत्याने निघृण खून केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही फरार आरोपींना पुणे येथून गुरूवारी (ता. १४) पहाटे साडेतीनच्या सुमारास जेरबंद करून बेंबळी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.