Tomatoes brought for sale at the Karmad sub-market
sakal
- बाळासाहेब काळे
करमाड - दुष्काळी परिस्थितीत शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत असताना करमाड येथील टोमॅटो उपबाजारपेठ शेतकऱ्यांसह स्थानिक कामगारांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. टोमॅटोचा हंगाम वर्षातून सुमारे चार महिने चालतो. या काळात बाजारपेठेत दररोज ४० ते ५० लाख रुपयांची उलाढाल होत असून, सुमारे ५०० जणांना रोजगार मिळत आहे. रोख पेमेंट, चोख वजन आणि इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा या बाजारपेठेकडे ओढा वाढला आहे.