

Bank employee robbed of 5 lakhs in Kaygaon Gangapur
कायगाव : गंगापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून नवीन कायगाव येथील शाखेत कॅश वाहतूक करताना, बँक कर्मचाऱ्यांच्या हातातील पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 22) सकाळी 10 ते 10:30 च्या सुमारास घडली. गंगापूर-कायगाव रस्त्यावर जुने गणेशवाडी गावाच्या मागे एक किमी अंतरावर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.