MPSC Exam : शेतकरीकन्येची ‘एमपीएससी’त बाजी

अथक मेहनत जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास करीत कायगाव (ता. गंगापूर) येथील एका शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससीतून अधिकारी बनण्याचे ध्येय गाठले.
Aarti Dahitule
Aarti Dahitulesakal

कायगाव - अथक मेहनत जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास करीत कायगाव (ता.गंगापूर) येथील एका शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससीतून अधिकारी बनण्याचे ध्येय गाठले. तिची नुकतीच मंत्रालयात कर सहायक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

आरती जालिंदर दहितुले (२५) असे या मुलीचे नाव असून कठीण परिस्थितीतून तिने मिळविल्याने तिचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

आरतीने बीई ईलेक्टॉक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती पुण्याच्या टीसीएस कंपनीत नोकरी करत आहे. तिने पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोंग वस्ती जुने कायगाव येथे घेतले.

पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे पॉलिटेक्निक डिप्लोमा डिग्री केल्यानंतर आरतीने अधिकारी व्हायचे ठरवून घेतले आणि त्या अनुषंगाच्या जोरावर अहोरात्र अभ्यास सुरू केले.

याच बळावर तिने पूर्व तसेच मुख्य परिक्षेत यश मिळवत या पदाला गवसणी घातली. आरतीने यशाचे श्रेय वडील जालिंदर दहितुले, आई, सुनंदा दहितुले यांच्यासह सर्व कुटुंबीयांना दिले. मंत्रालयात काम करणारी आरती कदाचित गंगापूर तालुक्यातील एकमेव युवती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com