

Dry rivers and streams in Kedar Kheda have affected the traditional fishing livelihood of Bhoi community families
esakal
केदारखेडा, : यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने केदारखेडा (ता. भोकरदन) परिसरातील नदी, नाले आणि जलस्रोत अद्याप कोरडेच आहेत. याचा मोठा फटका नदी-नाल्यांमध्ये मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भोई समाजातील कुटुंबांना बसत आहे. पावसाळा संपत आला, तरी नदी-नाल्यांना पुरेसे पाणी नसल्याने मासे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर संकट निर्माण झाले आहे.
केदारखेडा येथील जालना-जळगाव महामार्गालगत मिळणारे ताजे मासे परिसरात प्रसिद्ध आहेत. जालना, भोकरदन तसेच सिल्लोड परिसरातून अनेक ग्राहक ताजे मासे खरेदी करण्यासाठी येथे येतात. मात्र, यंदा नदी-नाल्यांमध्ये पाणीच नसल्याने स्थानिक पातळीवर मासे मिळणे अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी असतानाही ती पूर्ण करणे स्थानिक मासेमारांना अवघड झाले आहे
पावसाळा हा मासेमारी व्यवसायासाठी महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र, याच काळात नदी-नाले कोरडे असल्याने यंदा या व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटली आहे. दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम रोजच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर होत असून, शासनाने या पारंपरिक व्यवसायाकडे लक्ष देऊन संबंधित कुटुंबांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
परराज्यातून मासे खरेदी करण्याची वेळ
स्थानिक जलस्रोतांमध्ये मासे मिळत नसल्याने काही मासेमारांना परराज्यातून किंवा इतर भागांतून मासे खरेदी करून विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवावा लागत आहे. मात्र, बाहेरून मासे खरेदी करण्यासोबत वाहतूक व इतर खर्च वाढत असल्याने अपेक्षित नफा मिळत नसल्याचे मासेमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.