Women Health : केज उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतींचे प्रमाण वाढले; महिन्याला सरासरी ९० वरून १३० प्रसूतींपर्यंत सुधारणा, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या हस्तक्षेपामुळे गरजू रुग्णांना दिलासा.
केज : पूर्ण केज तालुका आणि धारुर तालुक्यातील काही भागांचा अंतर्भाव असलेल्या केज उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे कुशल मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक असूनही मागच्या काळात प्रसुतींची संख्या कमी झाली होती.